About Us

दैनिक प्रीतिसंगम

संपादक- शशिकांत पाटील

पत्ता - गोदावरी प्लाझा, हेड पोस्टाजवळ, शनिवार पेठ कराड- 415 110 जि. सातारा.


1 मे 1997 रोजी महाराष्ट्र दिनी दैनिक प्रीतिसंगम ची स्थापना सातारा जिल्ह्यातील कराड शहरात करण्यात आली. दैनिकाचा प्रकाशन सोहळा तत्कालीन पालक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभ हस्ते आणि कराड चे भाग्यविधाते स्व. पी. डी. पाटील साहेब यांच्या अध्यक्षते खाली पार पडला. यावेळी कराड शहरातून केवळ एकच दैनिक प्रकाशित होत होते. अशा या तालुका पातळी वरील ठिकाणी आम्ही हे वृत्त पत्र सुरू करण्याचे धाडस स्वीकारले व त्याला सर्व पातळीवर आजपर्यंत साथ मिळाली.


           कृष्णा कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमाने पावन झालेल्या कराड नगरीला ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व भॊगोलिक संस्कृती लाभली आहे. यासाठी अनेक थोर सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाने या भूमीचा नाव लौकिक सर्वदूर पसरविला आहे. स्व. यशवन्तरावजी चव्हाण साहेबानी महाराष्ट्र व देशाच्या जडण घडणीत दिलेले योगदान संपूर्ण देशाला परिचित आहे. या नगरीमधून आम्ही दैनिक प्रीतिसंगम हे वर्तमान पत्र आपल्या सहकार्याने चालवीत आहोत. कराड शहराची प्रगती सर्व पातळीवर होत असून यामध्ये आम्ही ही पाठीमागे राहायचे नाही, असा निश्चय केला आहे. शहराच्या विकासा मध्ये आमच्या दैनिकाचे स्थान वेगळे निर्माण झाले आहे. आज हे दैनिक सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात वितरित केले जात आहे.


           दैनिक प्रीतिसंगम ने कराड च्या विकासामध्ये हातभार लावला असून प्रत्येक प्रश्ना कडे एक चळवळ म्हणून पाहिले आहे. भविष्यात दैनिक प्रीतिसंगम जिल्ह्याचे मुखपत्र करण्याचा मानस असून त्याला आपल्या सारख्यांची साथ अपेक्षित आहे.